विश्वजीत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शेवगाव ही संस्था आपल्या सदस्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी समर्पित आहे. संस्थेची स्थापना विश्वास, पारदर्शकता आणि उत्तम सेवांच्या तत्वांवर आधारित आहे.
आम्ही आमच्या सदस्यांना विविध आकर्षक ठेव योजना आणि सोप्या अटींवरील कर्ज सुविधा उपलब्ध करून देतो. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे व जलद सेवा देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
संस्थेचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर जिल्हा असून आम्ही सुरक्षित आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आमचे ध्येय म्हणजे सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या प्रगतीत हातभार लावणे आणि त्यांना सुरक्षित व उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत करणे.
माहिती
संस्था आधुनिक तंत्रज्ञान वापरुन २४ तास ३६५ दिवस ऑनलाइन मोबाईल बँकिंग सेवा देते
SMS व OTP सुविधामुळे सभासदाचे व्यवहार सुरक्षित राहतात.
ग्रामीण भागातील लोकाना आर्थिक व सामाजिक समृद्ध करण्यासाठी हक्काची पतपुरवठा करणारी व वेळोवेळी सुलभ बँकिंग सेवा देण्यासाठी दिनांक १०/०१/२०२३ रोजी २२०० सभासद व ३५,००,०००/- रु. भाग भांडवलावर विश्वजित अर्बन पतसंस्था शेवगाव येथे सुरू केली.
संस्थेची उद्देश
१. सभासदाच्या ठेवी स्वीकारणे त्यावर योग्य व्याज परतावा देणे.
२. ग्रामीण भागात सभासदला बँकिंग सुविधा देणेव आर्थिक सक्षम बनवणे.
३. सभासदाना बचतीची सवय लावून आर्थिक मदत करणे.
४. सभासदाना कर्ज पुरवठा करणे.
५. स्थानिक व्यावसायिकाना व्यवसायवाढीसाठी कर्ज पुरवठा करणे.
६. शिक्षण,आरोग्य व स्वच्छता कार्यक्रम राबवणे.
७. मागता क्षणी पैसे परत हे या तत्वावर पैसा सुरक्षित गुंतवला जातो.
८. सहकार कायद्याचे तंतोतंत पालन करणारी संस्था.
९. शाळा मार्फत लहान मुलांमध्ये आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवणे.
संस्थेची वैशिष्ट्ये
कोअर बँकिंग सुविधा
संगणकीकृत पारदर्शक कामकाज करणारी संस्था
विश्वासू व तज्ञ संचालक मंडळ
तत्पर सेवा देणारा विनम्र व प्रशिक्षित सेवक वर्ग
सुलभ कर्ज प्रकिया
मोबाईल बँकिंगची सुविधा
SMS बैंकिंग
RTGS / NEFT / IMPS ची सुविधा
ठेवींच्या विविध योजना व आकर्षक व्याजदर